पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सब्जी मंडी जवळ आज रविवारी दिनांक 10 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळला. गोपाल शंकरलाल शर्मा (35) असे मृतकाचे नाव आहे. घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान घटनेची माहिती वणी पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. गोपाळचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. गोपाल हा विवाहित होता. तो नाष्टा सेंटरचा कारागीर होता. तो विविध प्रकारचा नाष्टा उत्तमरित्या बनवायचा. मात्र त्याला दारूचे व्यसन असल्याची माहिती परिसरातील लोक देत आहे. गोपाळचा मृत्यू कशाने झाला याचा तपास पोलीस करीत आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.