‘अधुरी कहाणी’वाल्या नराधम सासऱ्याच्या आवळल्या मुसक्या

बल्लारपूर येथून अटक, दोन दिवसाची पोलीस कोठडी

11

जितेंद्र कोठारी, वणी: माहेरी आलेल्या सुनेवर अत्याचार करुन पसार झालेल्या नराधम सासऱ्याला वणी पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील त्याच्या गावातून सोमवारी सकाळी वणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपी सासरा (59) याला आज वणी न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनेसोबत अत्याचार करताना पीडितेच्या आईने रंगेहाथ पकडल्यानंतर सासरा पसार झाला होता. 

पीडित महिलेचे (30) लग्न 2016 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुणासोबत झाले होते. मात्र विवाहितेच्या वृद्ध सासऱ्याने नात्याला काळिमा फासून तिच्यावर अनेकदा बळजबरीने अत्याचार केले. दिवाळीच्या सणाला पीडित विवाहिता वणी येथील माहेरी आली. तेव्हापासून ती इथेच राहत होती. 6 जानेवारी रोजी तिला सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या नराधम सास-याने संधी साधून तिच्यासोबत पुन्हा दुष्कर्म केले. मात्र त्याचवेळी विवाहितेची आई घरी पोहचली व तिनं सासऱ्याला मुलीवर अत्याचार करीत असताना बघितले. त्या घटनेनंतर आरोपी पसार झाला होता.

याबाबत अत्याचार पीडित युवतीच्या आईने रविवार 9 जानेवारीला वणी पो.स्टे. मध्ये तक्रार दिली होती. तक्रारीवरून पीएसआय प्रवीण हिरे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकांनी सोमवारी सकाळी 11 वाजता दरम्यान नराधम सासरा (59) याला त्याच्या गावातून अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार पोनि शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पीएसआय प्रवीण हिरे, कॉन्स्टेबल शुभम सोनूले, विठ्ठल बुरुजवाडे, चालक सुरेश किनाके यांनी शिताफीने ही कारवाई पार पाडली.

हे देखील वाचा:

करणवाडीजवळ दुचाकीचा अपघात, वणीतील दोन तरुण जखमी

सावधान… वणी तालुक्यात कोरोना पुन्हा काढतोय डोके वर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.