पुनवट येथे घरफोडी, ३२ हजारांचा मुद्देमाल लंपास

0 1,510

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील पुनवट येथे दि.७ शुक्रवारी रात्री दरम्यान घरफोडी झाली. यात ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. सदर घटनेची फिर्याद शिरपूर पोलिसात योगिता धोटे यांनी शनिवारी सकाळी दाखल केली.

शिरपूर पोलीस ठाण्यापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पुनवट येथील योगिता विठ्ठल धोटे (वय ४५) यांच्या घरी ही चोरी झाली. घटनेच्या रात्री योगिता वणी येथे आपल्या नातेवाईकाकडे गेल्या होत्या. आरोपीने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

या घटनेत एक सोन्याची पोत, कानातील टाप आणि नगदी १४ हजार रूपये असा एकूण ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. सदर चोरी गावातीलच युवकांनी केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पोलीस प्रमोद जुनूनकर पुढील तपास करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.