द्वारका अपार्टमेंटचे सांडपाणी आदर्श कॉलोनीत

डासांच्या प्रादुर्भावामुळे आदर्श कॉलॉनिवासीयांचे आरोग्य धोक्यात

8

जितेंद्र कोठारी, वणी: येथील यवतमाळ रोडवरील द्वारका अपार्टमेंटचे सांडपाणी आदर्श कॉलोनीचे खुल्या प्लाटवर साचत असल्याने आदर्श कॉलोनीवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषदकडे अनेकदा तक्रार करूनही यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

प्राप्त माहितीनुसार आदर्श कॉलोनी परिसरातील द्वारका अपार्टमेंटच्या सांडपाण्याची नाली फुटून सर्व घाण व पाणी एका खुल्या प्लॉटवर साचले आहे. साचलेल्या पाण्यात मोठं प्रमाणात दुर्गंधी व डासांची उत्पत्ती झाली आहे. मागील एका वर्षांपासून फुटलेल्या या नालीची दुरुस्ती करण्यात आली नाही. याबाबत आदर्श कॉलोनी येथील नागरिकांनी अनेकदा नगरसेवक व प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र सतत दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

द्वारका अपार्टमेंट जवळ फुटलेल्या नालीची दुरुस्ती व साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी आदर्श कॉलोनी येथील नागरिक करित आहे.

हे देखील वाचा:

मनसेच्या शहराध्यक्षपदी शिवराज पेचे, गितेश वैद्य उपाध्यक्ष

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.