बॉलरने गाजवला T-10 चा तिसरा दिवस… अष्टपैलू पेंटरची धडाकेबाज कामगिरी

विराज बदकी, अक्षय धावंजेवार, अमरीश यादव, लखन चौधरी यांची तुफानी गोलंदाजी...

12

विवेक तोटेवार, वणी: गेले दोन दिवस धडाकेबाज फलंदाजीने गाजत असलेल्या T-10 मध्ये आजचा दिवस बॉलरने गाजवला. श्रीराम वॉरिअर्सचा विराज बदकी, जन्नत 11 चा अक्षय धावंजेवार, रेनबो संघाचा अमरीश यादव, माऊली संघाचा लखन चौधरी या बॉलरनी प्रतिस्पर्धी संघाचे आपल्या गोलंदाजीने कंबरडे मोडले. पहिला सामना झाल्यानंतर पाऊस आल्यानंतर एक सामना रद्द झाला व त्यानंतर उर्वरित सामने हे 7 ओव्हरचे खेळले गेले. कमी ओव्हरची मॅच असल्याने यात बॅट्समन बॉलरची दाणादाण उडवून देणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र संपूर्ण दिवसात झालेल्या मॅचमध्ये बॉलरचेच वर्चस्व दिसून आले. जन्नत 11 चा अक्षय उर्फ पेंटर धावंजेवार हा अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आजच्या दिवसाचा हिरो ठरला. तुर्नामेंटमध्ये 5 गुण घेऊन आमेर 11 अद्यापही अव्वल स्थानी आहे. पारसमल प्रेमराज ज्वेलर्सतर्फे या चॅम्पियन लीगचे आयोजन करण्यात आले आहे. 

आज शनिवारी पहिला सामना हा श्रीराम वॉरिअर्स विरुद्ध एम ब्लास्टर यांच्यात खेळला गेला. श्रीराम वॉरिअर्स संघाचा कार्तिक देवडे याने 14 चेंडूत चार चौकाराच्या मदतीने 25 धावा केल्या. तर शुक्रवारच्या सामन्यात धडाकेबाज बॅटिंग करणा-या महेश राठोड उर्फ बिल्ला याने आजही आपला जलवा दाखवत 20 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने 29 धावा केल्या. श्रीराम संघाने 7 गडी गमावून 85 धावा काढल्या. 86 धावांचे सामान्य टारगेट अचिव्ह करताना एम ब्लास्टर संघाला मात्र सूर गवसला नाही. या संघाचा कोणताच खेळाडू खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही.

श्रीराम संघाचा ओपनर बॉलर विराज बदकी याने आपल्या धारदार गोलंदाजीने एम ब्लास्टर संघाचे चांगलेच कंबरडे मोडले. त्याने आपल्या दोन षटकात 13 धावा देत 4 गडी बाद केले. एम ब्लास्टर संघ हा 10 षटकात सर्वबाद 71 धावांपर्यत मजल मारू शकला. हा सामना श्री राम संघाने 14 धावांनी सहजतेने जिंकला. सामन्याचा सामनावीर विराज बदकी याला ठरविण्यात आले.

दुसरा सामना आमेर नाईट रायडर विरुद्ध राजपूत रॉयल्स यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करीत राजपूत रॉयल्स संघाने 91 धावा केल्या. आमेर संघाने या धावांचा पाठलाग करीत असतानाच सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. या दोन्ही संघाला प्रत्येकी 1 गुण मिळाले आहे.

पावसामुळे 7 ओव्हरची मॅची
पावसामुळे उर्वरित तिन्ही सामने हे निर्धारित 7 षटकांचे करण्यात आले. तिसरा सामना हा जन्नत 11 विरुद्ध जय महाकाली संघ यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करीत जन्नत संघाने 7 षटकात 5 गडी गमावून 66 धावा केल्या. 67 रन्सचे आव्हान जय महाकाली संघापुढे होते.

67 धावांचा पाठलाग करतांना जय महाकाली संघाची सुरवात खराब झाली. सुरवातीलाच गोलंदाजांनी दिलेल्या झटक्यामुळे टीम संपूर्ण सामन्यात टिकाव धरू शकली नाही. जय महाकाली संघाला 7 षटकात 9 गडी गमावून फक्त 33 धावा करता आल्या. हा सामना जन्नत संघाने 34 धावांनी अगदी सहजपणे जिंकला.

अष्टपैलू पेंटरची धडाकेबाज कामगिरी…
जन्नत 11 संघाकडून अक्षय धावंजेवार उर्फ पेंटर याने फक्त बॅटिंगनेच नाही तर बॉलिंगनेही आपली छाप सोडली. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करीता येत 19 चेंडूत 1 चौकार व 3 षटकारच्या मदतीने धडाकेबाज 31 धावा काढल्या. यात त्याने काही तुफानी फटके देखील लावले. तर बॉलिंग करताना त्याने 2 ओव्हरमध्ये फक्त 4 धावा देत 3 गडी बाद केले. तो या सामन्याचा सामनावीर ठरला.

सामनावीर अक्षय उर्फ पेंटर धावंजेवार

चौथा सामना हा 11 टायगर रोअरिंग विरुद्ध रेनबो यांच्यात खेळला गेला. हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. 11 टायगर यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. रेनबो संघाने निर्धारित 7 षटकात 75 धावा काढत 76 रन्सचे विशाल टारगेट 11 टायगर रोअरिंग संघापुढे ठेवले. पाठलाग करताना टायगर संघ संपूर्णत: ढेपळाला. संपूर्ण संघ 6.2 षटकात 26 धाव काढून तंबूत परतला. हा सामना रेनबो संघाने 49 धावांनी जिंकला. रेनबो संघाचा अमरीश यादव याने आपल्या बॉलिंगची कमाल दाखवत 2 षटकात 8 धावा देत 4 गडी बाद केले. अमरीश ला या सामन्याचा सामनावीर ठरविण्यात आले.

सामनावीर अमरीश यादव

पाचवा सामना हा माऊली मराठा विरुद्ध छत्रपती वारीअर्स यांच्यात खेळला गेला. नाणेफेक जिंकून माऊली मराठा संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. व निर्धारित 7 षटकात 8 गडी गमावून 49 धावा केल्या. टारगेटचा पाठलाग करताना छत्रपती वारीअर्स संघाची सुरवात खराब झाली. टारगेट कमी असले तरी हा सामना चांगलाच रंगला. छ. वॉरिअर्सला 7 षटकात 7 गडी बाद 35 धावाच करता आल्या. माऊली संघाचा लखन चौधरी याने आपल्या 2 षटकात 7 धावा देत 4 गडी बाद केले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. हा सामना माऊली संघाने 14 धावांनी जिंकला.

अंकतालिका
1) आमेर नाईट रायडर- 5
2) रेनबो – 4
3)11 टायगर रोअरिंग- 4
4) माऊली मराठा-4
5) श्रीराम वारीअर्स- 4
6) एम ब्लास्टर -3
7) जन्नत 11- 3
8) जय महाकाली -3
9) राजपूत रॉयल्स -2
10) छत्रपती वॉरिअर्स – 0

आज होणारे सामने
1) 11 टायगर रोअरिंग विरुद्ध जय महाकाली सकाळी 10 वाजता
2) राजपूत रॉयल्स विरुद्ध माऊली मराठा दुपारी 12 वाजता
3) जन्नत 11 विरुद्ध एम ब्लास्टर दुपारी 3 वाजता
4) छत्रपती वारीअर्स विरुद्ध श्री राम वारीअर्स सायंकाळी 5.30 वाजता
5) आमेर नाईट रायडर विरुद्ध रेनबो क्रिकेट क्लब रात्री 8 वाजता

या यूट्यूब चॅनलवर सर्व मॅच लाईव्ह बघता येणार आहे.
https://www.youtube.com/c/wdzlive/

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.