गुरुवारी निघालेत 7 पॉजिटिव्ह

परिसरात 'इथे' आढळलेत कोरोनाबाधित

0 11

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी तालुक्यात 7 पॉजिटिव्ह आलेत. त्यातील कुंभरखणी1, माजरा 2, गणेशपूर1, वांजरी 1, जि. प. कॉलनी 1, रंगारीपुरा 1 यांचा समावेश आहे. गुरुवारी आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 667 झाली आहे.

गुरुवारी 31 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. अद्याप 53 अहवाल येणे बाकी आहेत. सध्या तालुक्यात एकूण 667 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 649 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात18 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या 19 झाली आहे.

                                           15 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
कोरोना मुक्त झालेल्या 15 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 18 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 7 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 12 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 5 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 6 व्यक्ती भरती आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.