शिरपूर-कोरपना रोडवर दुचाकीचा अपघात

सुकनेगाव येथील तरुणाचा मृत्यू

0 10

विवेक पिदूरकर, शिरपूर: आज शुक्रवारी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी शिरपूर-कोरपना रस्त्यावर अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मृतकाचे नाव प्रकाश बापूराव मेश्राम (29) असून तो सुकनेगाव येथील रहिवाशी होता.

प्रकाश हा आज सकाळी कामानिमित्त सुकनेगावरून त्याच्या होन्डा शाईन या दुचाकीने (MH29 AQ 6601) कुरईला गेला होता. काम आटपून तो त्याच्या गावी परत येत होता. दरम्यान दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास खांदला व शिरपूरच्या दरम्यान प्रकाशचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. त्याची गाडी रस्त्याच्या खाली गेली.

या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती तातडीने शिरपूर पोलीस स्टेशनला देण्यात आली. शिरपूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरीता वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे. प्रकाशच्या पश्चात आई, वडील, भाऊ व आप्त परिवार आहे.  

शिरपूर-कोरपना रस्त्याची दुरवस्था
शिरपूर-कोरपना रस्त्याची स्थिती दयनिय आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. यारस्त्यावरून मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वारांची वाहतूक होते. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन या मार्गाने प्रवास करावा लागतो. या रस्त्याबाबत स्थानिकांनी प्रशासनाला निवेदनही दिले आहे. याआधीही या रस्त्यावर छोटे मोठलअपघात झाले आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.