दुचाकी मालक व्यायाम करण्यात दंग, चोरट्याने दुचाकीवर केला हात साफ

15

जितेंद्र कोठारी, वणी : येथील पाण्याची टाकीजवळ शासकीय मैदानावर व्यायाम करण्याकरिता गेलेल्या युवकाची स्प्लेंडर मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली. फिर्यादी कैलाश वामन वागडकर रा. गोकुळनगर वणी यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार फिर्यादी हा 7 सप्टे. रोजी सायंकाळी 6.30 वाजता व्यायाम करण्याकरिता पाण्याची टाकीजवळ शासकीय मैदानावर आला होता. त्यांनी आपली हिरो स्प्लेंडर मो.सा. क्र. MH 29BK8784 ही गेट समोर उभी करून ठेवली होती. व्यायाम करून परत आल्यावर फिर्यादी यांना मोटरसायकल ठेवलेल्या ठिकाणी आढळली नाही. शोध घेऊन ही दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल चोरून नेल्याची तक्रार वणी पो.स्टे. येथे दाखल केली.  

दुचाकी चोरट्यांचा पोलिसांना आव्हान ?

शहरातून मोटरसायकल, मोपेड चोरीच्या घटना काही थांबायचा नाव घेताना दिसत नाही. आता तर पोलीस स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरातून दुचाकी चोरी करण्याची हिम्मत चोरटे करू लागले आहे. गुरुवार 7 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनला लागून असलेल्या शासकीय मैदानासमोरून चोरट्यांनी मोटरसायकल चोरून जणू पोलिसांना आव्हानच दिला आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.