शिरपूर पोलीस ठाण्यातील जप्तीच्या वाहनांचा लवकरच लिलाव

2 कार व 30 दुचाकीवर 15 ऑगस्ट आधी मालकी हक्क सिद्ध करण्याचे आवाहन

8

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये जप्तीत असलेल्या दुचाक्यांचा लवकरच लिलाव होणार आहे. याबाबत न्यायालयाने आदेश दिला आहे. यात 30 दुचाकी व 2 कारचा समावेश आहे. विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले हे वाहने असून वाहन मालकांना 15 ऑगस्ट पूर्वी मोटारसायकलच्या मूळ कागदपत्रासह शिरपूर पोलिस स्टेशनला येऊन आपला मालकी हक्क सिद्ध करावा, असे आवाहन ठाणेदार माधव शिंदे यांनी केले आहे. जर मालकांना मालकी हक्क सिद्ध करता आला नाही तर या वाहनांचा 15 ऑगस्ट नंतर लिलाव करण्यात येणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.