हृदयद्रावक…. आईची मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

म्हैसदोडका येथील धक्कादायक घटना, परिसरात हळहळ

0 11

नागेश रायपुरे, मारेगाव: पोटच्या 3 वर्षाच्या मुलासह आईने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे आज 9 ऑगस्ट रोजी 1.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मोनाली लक्ष्मण पारखी (29) जय लक्ष्मण पारखी (3) असे मृत झालेल्यांचे नाव आहेत.

प्राप्त माहिती नुसार, आज सकाळी मोनाली ही शेतात जातो असे घरी सांगून तिच्या मुलाला घेऊन गेली. दुपारी गावापासून 1 कि.मी. अंतरावर असलेल्या गावातीलच बोधाने यांच्या शेतातील विहिरीत दोघांचाही मृत्यूदेह तरंगत असल्याचा आढळला. घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना कळताच तात्काळ घटना स्थळी जाऊन पंचनामा करून दोघाही मायलेकाचा मृत्यूदेह पीएमसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

वृत्त लिहेपर्णत मोनालीच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास पो. नि. जगदीश मंडलवार पो.उप.नि. अमोल चौधरी यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करत आहे. मायलेकाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.