पुरामुळे रांगणा गावाजवळील पूल वाहून गेला

वणी-रांगणा मार्गावरील वाहतूक ठप्प, शेतकरी व विद्यार्थ्यांना त्रास

15

जितेंद्र कोठारी, वणी: पुराच्या पाण्यामुळे तालुक्यातील रांगणा गावाजवळील गायकवाडी नाल्यावरील पुल कोसळून पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. लवकरात लवकर पुलाचे काम करावे अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा गावक-यांनी दिला आहे. 

वणी पासून 9 ते 10 किमी अंतरावर ते रांगणा-भुरकी हे गावं आहेत. वणी-रांगणा हा मार्ग रहदारीचा आहे. या मार्गावर गायकवाडी नाल्यावरील पुल अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. या पुलाच्या दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाला गावाकऱ्यानी अनेकदा निवेदन दिले होते. परंतु गावाकऱ्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर हा पुल कोसळून पुरात वाहून गेला आहे.

रांगणा ते वणी हा मार्ग विद्यार्थी व शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. सध्या शेती हंगाम सुरु असून शेतकऱ्यांना शेतीच्या मशागती करिता याचं मार्गाचा वापर करावा लागतो. परंतु पूल कोसळल्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

नाल्यावरील पुलाची त्वरित दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत करा अशी मागणी रांगना गावाकऱ्यानी केली आहे. पुलाचे काम त्वरित सुरु न केल्यास गावकऱ्यांमार्फत बांधकाम विभागाला घेराव करू असा इशारा रांगना ग्रामपंचायत उपसरपंच अँड्. दिलीप परचाके, सरपंच रंजना प्रकाश बोबडे, रविकांत वांढरे, धर्मराज जरीले, प्रकाश बोबडे, महादेव कातकर, राजेश वांढरे, दौलत दुर्गे, रामनाथ जरीले, नीलकंठ गोंडे, शेखर वांढरे, रमेश भोयर, प्रकाश बोढे, सुरेश पारशिवे, गंगाराम शिवरकर, नवरंग तेलंग, मारोती तेलंग, संजय तांबे, गजानन पाऊणकार याचेसह महिला बचत गटाच्या महिलां यांनी दिला आहे.

हे देखील वाचा:

दुस-या फळीतील नेत्यांना वेध थेट नगराध्यक्ष निवडणुकीचे

मार्वलच्या जादूई दुनियेची करा सफर, थॉर – लव्ह ऍन्ड थंडर रिलिज

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.