दुचाकी चोराला काही तासातच अटक

बँकेसमोरून चोरट्याने पळवली होती दुचाकी

0 1,758

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी 8 जून रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान शहरातील यवतमाळ मध्यवर्ती बँकेपासून एक दुचाकी चोरी गेली. याबाबत तक्रार वणी पोलिसात देण्यात आली. पोलिसांनी अगदी काही तासांतच आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक केली व दुचाकी ताब्यात घेतली.

सोमवार 8 जूनला गजानन नीलकंठ धांडे (44) रा. कळमना हे बँकेत काम असल्याने आपली दुचाकी क्रमांक MH 29 AP 8438 ठेऊन यवतमाळ मध्यवर्ती बँकेत गेले. काम संपवून बघितले असता दुचाकी कुठेही दिसून आली नाही. शेवटी त्यांनी वणी पोलिसात याबाबतची तक्रार दिली.

तक्रार मिळताच वणी पोलिसांनी 3 तासात आरोपी व दुचाकीचा शोध घेतला. त्यानुसार त्यांनी दोन्ही आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव अजय रामदास दांडगे (22) रा नांदेपेरा, अमोल शंकर डाखरे (27) रा नांदेपेरा असून पुढील तपास सुरू आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.