मारेगाव तालुक्यात आज 80 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

54 रुग्णांनी केली कोरोनावर मात

0 15

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 9 मे रोजी आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार तालुक्यातील 54 रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे. तर आज पुन्हा 80 पॉझिटिव्ह रुग्ण तालुक्यात आढळले आहे. तर आज एका 60 वर्षीय पुरुषाचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज यवतमाळ येथून 189 रिपोर्ट प्राप्त झाले. यात 38 पॉझिटिव्ह आढळले आहे. तसेच आज 498 व्यक्तींनी रॅपिड ऍन्टिजन टेस्ट केली असता या 42 संशयीत पॉझिटिव्ह आहे. असे एकूण 80 पॉझिटिव्ह रुग्ण आज तालुक्यात आढळले आहे. आज 54 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सध्या तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 398 आहे. यापैकी कोविड सेंटर वर 27 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. तर 357 पॉझिटिव्ह होम आयसोलेशन आहे. 10 रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे.

हे देखील वाचा:

आनंदाची बातमी…. एकाच दिवशी 183 रुग्णांची कोरोनावर मात

पहिल्याच दिवशी 100 पेक्षा अधिकांवर कारवाईचा बडगा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.