संजय खाडे यांचा प्रचाराचा झंझावात… कॉर्नर सभा, गृहभेटीचा धडाका

प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ गावखेड्यात दौरे

9

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून भाजप (एनडीए) आणि काँग्रेस (मविआ) दोन्ही पक्ष सध्या प्रचारात व्यग्र आहेत. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तस तसा प्रचाराचा धडाका वाढताना दिसत आहे. वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा प्रचाराचा झंझावात सुरु असून काँग्रेसचे सर्वच नेते तसेच इंडिया आघाडीचे घटक पक्ष प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचाराला लागले आहेत. कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेसचे संजय खाडे व सहकारी हे प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ वणी विधानसभा क्षेत्रात कॉर्नर सभा, गृहभेटीचा धडाका लावला आहे. त्यांच्या बैठक व सभेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहेत.

काँग्रेसच्या विविध टीम वणी विधानसभा क्षेत्राच्या विविध भागात सध्या प्रचार करीत आहे. अशीच एक टीम म्हणजे संजय खाडे यांची. संजय खाडे आणि सहकारी हे सध्या प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ गावखेडे पिंजून काढीत आहे. सकाळपासून सुरु झालेला हा प्रचार रात्री उशिरा पर्यंत सुरु असतो. कधी कधी शेवटच्या गावाहून परतण्यास मध्यरात्र देखील होते. मात्र पुन्हा सकाळी त्याच उत्साह व जोशात पुन्हा प्रचार सुरु होतो. रोज एक भाग निवडून त्या भागात रात्री उशिरा पर्यंत प्रचार सुरु असतो. गेल्या पाच ते सहा दिवसात जवळपास 30 ते 40 गावांचा दौरा करण्यात आला आहे.

मतदारसंघात भाजप विरोधी लाट – संजय खाडे
महागाई, बेरोजगारी आणि संविधानाची रोज होणारी पायमल्ली याने सर्वसामान्य मतदारांमध्ये भाजपविरोधात संताप असल्याचे प्रचारा दरम्यान दिसून येत आहे. यावेळी मतदारांनी भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार त्यांचा भाजपविरोधातील संताप त्यांच्या मतदानातून व्यक्त करून भाजपचा पराभव करणार याची खात्री आहे.

प्रचारासाठी प्रा. शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, उत्तम गेडाम, अनिल भोयर, जितेंद्र बोंडे यांच्यासह गावातील काँग्रेस, इंडिया आघाडीचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.