लग्नाची खरेदी पडली जास्तच महागात, चोरट्याने साधला डाव

चहाचे पैसे देताना पर्स चोरल्याचे उघडकीस

0 10

विवेक तोटेवार, वणी: लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या एका महिलेची पर्स लंपास केल्याची घटना रविवारी घडली. यात महिलेचे सोन्याचा टोप, मोबाईल आणि नगदी रक्कम होती. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की संगीता सुभाष ताजने या निवली येथील रहिवाशी आहे. त्यांच्या ननंदचे लग्न जुळले आहे. त्यामुळे रविवारी 7 फेब्रुवारीला त्या आपल्या पती व मुलांसोबत लग्नाच्या खरेदीकरिता वणीत आल्या. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांची लग्नाची खरेदी संपली. त्यानंतर त्यांनी गांधी चौकातील एका दुकानातून किराणा समान घेतले व तेथून राजपुताना हॉटेलमध्ये ते चहा, नाष्टा करण्याकरिता आले.

यादरम्यान त्यांच्या सामनाच्या थैलीत ठेऊन असलेली पर्स दिसून आली नाही. ज्यामध्ये सोन्याचे टॉप, मोबाईल व नगदी असा एकूण 13 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल होता. भांबावलेल्या अवस्थेत त्यांनी ज्या ज्या दुकानात गेले तेथे विचारणा केली. परंतु पर्स मिळाली नाही.

यानंतर त्यांनी वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

अखेर ‘त्या’ घोटाळेबाज न.प. कर्मचाऱ्याला अटक

जामनी येथे आज पुन्हा 5 जनावर दगावले, बळींची संख्या 35

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.