देशमुखवाडी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दुपारी 1 वाजताच्या दरम्यानची घटना

10

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील देशमुखवाडी परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मनोज महादेव चकोर (अंदाजे 40) असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव असून तो कार चालक असल्याची माहिती मिळत आहे. आज बुधवारी दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास मनोज आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे त्याचे कुटुंब शेजारी राहत असलेल्या नातेवाईकांना बोलावण्यास गेले. दरम्यान मनोजने घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. घरी आल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना मनोजने गळफास घेतल्याचे आढळून येताच त्यांनी याची माहिती पोलीस स्टेशनला दिली. मृतकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई असा आप्त परिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

हे देखील वाचा:

वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम व सर्वात मोठी पाणीटंचाई

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.