मोहदा येथे जुगार खेळताना 5 जणांना अटक

अवैध कृत्यांवर शिरपूर पोलिसांची करडी नजर

12

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत मोहदा येथे अवैधरित्या गंजीपत्ता जुगार खेळताना 5 जणांना शिरपूर पोलिसांनी अटक केली. जुगाऱ्यांकडून पोलिसांनी बावन पत्त्यांसह 4620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार शिरपूरचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी मोहदा गावालगत एका ठिकाणी रेड केली. त्या ठिकाणी 5 इसम अवैधरित्या बावन गंजीपत्यावर पैशांचे हारजीत खेळताना आढळले.

घटनास्थळ वरून पोलिसांनी पद्माकर देठे, ऋषी ढुमणे, मंगलदास टेकाम, विठ्ठल आडे आणि भारत कोडपे सर्व रा. मोहदा याना अटक करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल केले आहे.

सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक राम कांडुरे, कॉन्स्टेबल घोडाम, सुगत दिवेकर, कोवे, सावसाकळे, अमित पाटील यांनी पार पाडली.

हे देखील वाचा:

मारधाड, ऍक्शनसाठी वणीकरांनो राहा सज्ज… वणीत सूर्यवंशी रिलीज

पांढरदेवी येथे गाय गोधनाच्या दिवशी रंगतो अद्भूत सोहळा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.