विषबाधीत मृत शेतकरी कुटुंबाच्या घरी आमदारांची भेट

भेट घेऊन कुटुंबाचं केलं सांत्वन

0 335

ज्योतिबा पोटे, मारेगाव: गेल्या दोन महिन्या पासून तालुक्यातील कीटक नाशक फवारनीतून विषबाधाचे तांडव सुरु आहे, यात तrन शेतकऱ्यांच्या मृत्यु झाला झाला असून, या मृताच्या कुटुंबीयांची वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांस आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.

तालुक्यातील घोडदरा येथील कीटकनाशक फवारणी करीत असतना विष बाधेतुन मृत्यु झालेल्या दिवाकर तूळसिराम घागी ,टाकळी कुंभा येथील शंकर विठल गेडाम व पिसगाव येथील शंकर नागो आगलावे यांचे घरी जाउन आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांनी भेट देऊन सांत्वन केले या वेळेस आमदारसह भाजपा अध्यक्ष शंकर लालसरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.