धानोरा(जुना) जिल्हा परिषद शाळेत व्यवस्थापन समितीची निवड

0 342

सुशील ओझा, झरी: तालुक्यतील धानोरा (जुना) येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची निवड शनिवार दिनांक ६ ऑक्टोबरला झाली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून पालक संतोष प्रभाकर सासनवार तर उपाध्यक्ष म्हणून अरविंद काशिनाथ भोयर यांची पालकांमधून एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

मावळते अध्यक्ष संतोष वासाड यांनी नवनिर्वार्चित समितीस पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व पालकवर्ग, मुख्याध्यापक व सर्व सहाय्यक शिक्षकवृंद यांनी नवीन समितीचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक मुंडे यांनी सचिव म्हणून निवडीसंबंधीचे संपूर्ण कार्य पार पाडले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.