चोरट्यांची ‘पोल’खोल, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

वणीत भंगार चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश

0 1,024

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नांदेपेरा रोडवर स्थित महालक्ष्मी नगर येथून काही दिवसांअगोदर विद्यत लाईनसाठी लावलेले पोल चोरी गेले होते. याबाबतची तक्रार लेआऊट धारकाने पोलिसात केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी चार चोरट्यांना अटक केली. त्याच्याजवळून चोरीचा मालही हस्तगत करण्यात आला.

नांदेपेरा रोडवर शैलेश तोटेवार यांचे महालक्ष्मी नगर नामक ले आउट आहे. या लेआऊटमध्ये विद्युत तारा लावण्यासाठी लोखंडी पोल बोलावण्यात आले होते. पोल लावण्याचे काम सुरू असतानाच अज्ञात चोरट्यांनी 4 ऑक्टोबर रोजी लावलेले 8 पोल चोरून नेले. याबाबत लेआऊट धारकाने पोलिसात तक्रार दिली.

पोलीस चोरट्यांच्या शोधात असतानाच ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना खबर मिळाली की बोलेरो मालवाहक गाडी क्रमांक एम एच 29 टी 6785 या गाडीतून सदर माल जात आहे. ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी त्वरित डी बी पथकास पाचारण केले. डी पी पथकाने रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास चारही आरोपी व संबंधित गुन्ह्यात उपयोगात आणलेले वाहन ताब्यात घेतले.

या प्रकरणी राजू नारायण मोरे (29), संजय पंजाब वायकर (22), संजय राजू धुमाळ (29), राकेश नागेश्वर डोंगेवार (26) या चारही आरोपींवर कलम 379, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकातील सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, सुदर्शन वनोळे, दीपक वान्द्रसवार, अमित पोयाम, नितीन सलाम यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.