वसंत जिनिंगचा उद्या शेतकरी मंदिरात शेतकरी सभासद मेळावा

शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

10

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता दी वसंत जिनिंग को-ऑप शेतकरी जिनिंग ऍन्ड प्रेसिंग फॅक्टरीचा शेतकरी सभासद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार राहणार आहे तर प्रमुख पाहुणे हे खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, व मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. टीकाराम कोंगरे राहणार आहे.

याशिवाय या कार्यक्रमाला प्रमोद वासेकर, प्रमोद निकुरे, संध्या बोबडे, ज्योती सूर यांची देखील प्रमुख उपस्थिती राहणार आहे. वसंत जिनिंग ही वणी उपविभागातील सहकार क्षेत्रातील एक यशस्वी संस्था असून उपविभागात 5 ठिकाणी या संस्थेचे युनिट आहे.

या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वसंत जिनिंगचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे, उपाध्यक्ष प्रशांत गोहोकार यांच्यासह विवेकानंद मांडवकर, प्रेमकुमार खुराणा, राजाभाऊ पाथ्रडकर, भास्कर ढवस, सुनील वरारकर, उदय रायपुरे, संजय खाडे, जनक नावडे, दादाजी येवले. प्रेमिला पावडे, सुलोचना कातकडे, वामनराव येलचलवार यांनी केले आहे.

हे देखील वाचा:

भालरच्या जंगलात कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

सहकार क्षेत्र ही विकासाची चावी: देविदास काळे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.