बंडा येथील शेतकऱ्याने केले विष प्राशन

वणीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू

0 10

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील बंडा (वरझडी) येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन केल्याची घटना दि 8 मंगळवारी सायंकाळी घडली. त्याच्यावर वणीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विठ्ठल अर्जुन गौरकार (52) असे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विठ्ठलने सायंकाळी पाच वाजता त्याच्या घरी कीटकनाशक प्राशन केले. सदर बाब घरच्या मंडळीच्या लक्षात येताच त्याला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु उपचारापूर्वीच त्याला चंद्रपूरला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र घरच्या मंडळींनी विठ्ठलला एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.