घरासमोर ठेवलेले ऍल्युमिनियम तारेचे बंडल लंपास

12

जितेंद्र कोठारी, वणी : खाजगी विद्युत कंत्राटदारांनी कामासाठी आणून ठेवलेले ऍल्युमिनियम तारेचे 2 बंडल अज्ञात चोरट्याने लंपास केले. फिर्यादी धनंजय किसन गोवारदीपे रा. आनंदनगर वणी यांनी सोमवार 8 ऑग. रोजी दिलेल्या तक्रारीनुसार खाजगी इलेक्ट्रिक कामासाठी त्यांनी ऍल्युमिनियम तारेचे 5 बंडल आणले होते. त्यापैकी 3 बंडल वापरात आणले व उर्वरित 2 बंडल त्यांनी घरासमोर खुल्या जागेवर ठेवले होते. दि. 1 ऑगस्टच्या मध्यरात्री सुमारास अज्ञात चोरट्याने 50 मिमी जाडीचे अंदाजे 233 किग्रा वजनी व 30 हजार किमतीचे ऍल्युमिनियम तारेचे दोन्ही बंडल लंपास केले. तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.