दारूच्या पैशासाठी पत्नीला मारहाण, केगाव येथील घटना

सोडवायला गेलेल्या सासऱ्यास सुद्धा मारहाण

0 23

भास्कर राऊत, मारेगाव: सतत दारू पिण्याचे व्यसन असलेल्या व नेहमी पत्नीस मारहाण करणाऱ्या नवऱ्यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पतीवर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मौजा धामणी येथील ज्ञानेश्वर देठे हे आपल्या कुटुंबियांसोबत सध्या केगाव येथे आपल्या सासुरवाडीला राहत आहे. पती ज्ञानेश्वर याला दारू आणि जुगाराचे व्यसन आहे. याच व्यसनापायी धामणी येथील घर, शेती व मारेगाव येथे असलेले वेल्डिंगचे दुकान सुद्धा विकावे लागले.

मागील काही वर्षांपासून ते दोन मुले यांच्यासाहित केगाव येथे राहत आहे. अशातच दि. शनिवारी दिनांक 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान ज्ञानेश्वर बापूराव देठे हा दारू पिऊन घरी आला. आणि पत्नीला हातात चाकू घेऊन जीवंत मारण्याची धमकी देत लथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशातच पीडितेचे वडील सोडवायला आले असता त्यांना सुध्दा लाथाबुक्यांनी मारहाण केली.

नेहमी नेहमी होत असलेल्या या मारहाणीला कंटाळून पत्नी मनीषा ज्ञानेश्वर देठे (34) हिने मारेगाव पोलीस स्टेशन गाठत पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. यावरून पतीविरुद्ध कलम 323, 504,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा:

स्वातंत्र्य दिन ऑफर: सोलर झटका मशिनवर 10 टक्यांची सुट

पोलिसांचे नवीन सुंदर’कांड’, बडग्याच्या कोंबडबाजारासाठी ऍडव्हांस बुकिंग?

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.