बॅडमिंटन स्पर्धेत वणीच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

चंद्रपूर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

15

जितेंद्र कोठारी, वणी : चंद्रपूर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत वणी येथील अभिनव क्रीडा मंडळ बॅडमिंटन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे. अकॅडमीचे प्रशिक्षक पवन ढवस यांच्या मार्गदर्शनात बॅडमिंटन खेळाडूंनी वणीचे नाव उंचावले आहे. 5 मे ते 7 मे पर्यंत चंद्रपूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

बॅडमिंटन स्पर्धेत 11 वर्षाखालील गटात गार्गी राहुल खाडे हिने प्रथम क्रमांक पटकावले. 15 व 17 वर्षाखालील गटात सौम्या विनोद मुथा हिने सलग दुसरा क्रमांक मिळविला. 17 वर्षांखालील दुहेरीत राशी योगेश खिवंसरा आणि सौम्या विनोद मुथा या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. रौनक चिंडालिया, विरोचन गोडे, ईश्वर सोनटक्के, स्वरा गोखरे, सृष्टी आबड आणि सुखदा बिवलकर यांनीही उपांत्य फेरीपर्यंत विविध गटात झुंज देत चांगले स्थान मिळविले आहे. पालक आणि मुलांनी या यशाचे श्रेय प्रशिक्षक पवन ढवस यांना दिले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.