यवतमाळ रोडवरील नंदिनी बारमध्ये चोरी

रोख रकमेसह 35 हजाराचा मुद्देमाल चोरट्यानी लांबविला

11

जितेंद्र कोठारी, वणी: येथील यवतमाळ मार्गावरील नंदिनी बार अँड रेस्टॉरंटमध्ये चोरी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजता दरम्यान उघडकीस आली. पहाटे 3.30 वाजता सुमारास शटरचा कुलूप तोडून चोरट्यानी बारमध्ये प्रवेश केला आणि ड्रॉवरमधील 18 हजार रुपयांसह अंदाजे 17 हजाराची इंग्रजी दारूच्या शिश्या चोरून नेल्या.

पोलिसांनी बारमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता तोंडावर स्कार्फ बांधलेला एक इसम चोरी करीत असताना दिसून आला. नंदिनी बार अँड रेस्टॉरंटचे मॅनेजर शमशेर सिंग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

शहरात गुन्हेगारी वाढतेय…!
मागील काही काळापासून वणी शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच 2 दिवसांपूर्वी भाजीमंडी सारख्या गर्दीच्या ठिकाणहून भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतुन 2 लाख रुपये चोरट्यानी लांबविले. आणि आता मुख्य रस्त्यावर स्थित बारमध्ये चोरी करून चोरट्यानी जणू पोलिसांना आव्हान दिले आहे.

हे देखील वाचा –

कोळसा भरलेले ट्रक दोन दिवसांपासून वणी पोलीस ठाण्याच्या आवारात

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.