ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत कुमार केतकर बुधवारी वणीत

प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

7

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या लोकसभेची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. त्यात आमदार प्रतिभा धानोरकर यादेखील प्रचाराच्या आघाडीवर आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार म्हणून त्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या प्रचारार्थ ख्यातनाम वक्ते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार तथा दैनिक लोकसत्ताचे माजी संपादक कुमार केतकर यांची वणी येथे जाहीर सभा होत आहे. ही सभा बुधवार दिनांक 10 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता वसंत जिनींगच्या हॉलमध्ये होईल. या सभेला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.