आज तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण, रासा येथे कोरोनाचा शिरकाव

लॉकडाऊनच्या नियमांना 15 मार्चपर्यंत वाढ

0 11

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज सोमवारी दिनांक 8 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील दोन तर 4 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. वणी शहरातील रविनगर व टागोर चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर भालर टाऊनशिप, रासा, झोला व बाबापूर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आलेत. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 29 आहेत. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊनच्या नियमांची मुदत वाढवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 1 मार्चला लागू केलेले नियम जिल्ह्यात सर्वत्र लागू राहतील. यानुसार बाजारपेठेचा वेळ हा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहणार.  तसेच शनिवारी संध्याकाळी 5 ते सोमवारी सकाळी 9 पर्यत जिल्ह्यात संचारबंदी राहणार आहे. सदर नियम हे 15 मार्चपर्यंत लागू राहतील.

रविवारी 107 संशयीतांचे यवतमाळ येथून रिपोर्ट प्राप्त झालेत. यात 3 व्यक्ती आलेत तर 104 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 10 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यातील 3 व्यक्ती पॉजिटिव्ह तर इतर व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज 4 रुग्ण कोरनामुक्त झालेत.

सध्या तालुक्यात 29 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 1 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 22 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 6 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1268 रुग्ण आढळून आलेत. यातील 1214 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

आज जिल्ह्यात 151 जण पॉझेटिव्ह आलेत तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज 212 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मृत झालेल्या व्यक्तींमध्ये पुसद येथील 55 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 60 वर्षीय महिला आणि चांदूर रेल्वे येथील 58 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

हे देखील वाचा:

आवाहन: बॅग हरवली आहे…

अखेर नदीपात्रात बेपत्ता झालेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.