इन्स्टाग्रामवरून ओळख… शाळेतील मुलगी 9 आठवड्याची गर्भवती

आरोपी तरुण गजाआड, घटनेमुळे एकच खळबळ

12

वणी बहुगुणी डेस्क: सोशल मीडियावरून शाळेतील एका कुमारिकेची एका तरुणाशी ओळख झाली. दोघांमध्ये चॅटिंग आणि नंतर फोनवर संपर्क सुरु झाला. पुढे त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. एके दिवशी तरुणाने कुमारिकेसोबत अत्याचार केला. त्यानंतर प्रियकर वारंवार तिच्यावर अत्याचार करीत राहिला. मात्र एक दिवस अचानक कुमारिकेच्या पोटात दुखल्याने तिच्या पालकांनी तिला दवाखान्यात नेले. मात्र ती 9 आठवड्याची गर्भवती असल्याची बाब उघडकीस आली. मारेगाव तालुक्यात ही घटना घडली.  या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाच्या तात्काळ मुसक्या आवळल्या आहे.

सविस्तर वृत्त असे की पीडिता (14) ही तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून ती आठव्या वर्गात शिकते. ती इन्स्टाग्रामवर आहे. गेल्या वर्षी ती सातवीत होती. तेव्हा तिची गावातील एका तरुणाशी (23) इंस्टाग्रामवरून ओळख झाली. आधी त्यांच्यात चॅटिंगच्या माध्यमातून संवाद झाला. नंतर तो तिला फोन करू लागला. यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. एके दिवशी तरुणाने तिला एकांतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर तरुणाने बदनामीची धमकी देत पीडितेसोबत वारंवार अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. दोन तीन दिवसांआधी पीडितेच्या पीडितेच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तिच्या आईने तिला वणीतील एका खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी नेले. मात्र तपासणी केल्यावर डॉक्टरांना धक्का बसला. त्यांना ती 9 आठवड्याची गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती त्वरित पीडितेच्या आईला दिली. ही माहिती मिळताच पीडितेची आई हादरुन गेली.

डॉक्टरांनी पीडितेच्या आईला विश्वासात घेत याची माहिती पोलिसांना दिली. अखेर आईने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला व मारेगाव पोलीस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने आरोपीविरोधात भादंविच्या कलम 376, 376 (2) (जेएन), पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला व आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केल असता न्यायालयाने आरोपीला 3 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. प्रकऱणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक डॉ.ज्ञानेश्वर सावंत करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.