रेखाताई कुमार आंबटकर यांचे निधन

आज दुपारी 11.30 वाजता होणार अंत्यसंस्कार

8

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सर्वोदय चौक येथील रहिवाशी असलेल्या रेखाताई कुमार आंबटकर यांचे शुक्रवारी रात्री 11.02 मिनिटांनी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 61 वर्षांच्या होत्या. त्या डॉ. कुमार आंबटकर यांच्या पत्नी होत्या. गेल्या वर्षी डॉ. कुमार यांचेही निधन झाले होते. गेल्या काही काळापासून रेखाताई यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होता. त्यानंतर त्यांच्यावर वणी येथे उपचार सुरू होता. मात्र शुक्रवारी दिनांक 7 जानेवारी रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. रेखाताई यांची अंत्ययात्रा आज सकाळी 11.30 वाजता सर्वोदय चौक येथील राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा स्वप्निल, सौरभ, सुना नातवंड असा आप्त परिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.