नवीन वागदरा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने गावात हळहळ

1 13

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नवीन वागदरा येथे सोमवार दुपारी 4 वाजताच्या सुमारास एका युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. सूरज पुरुषोत्तम चिपडे (23) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

सुरज हा पाणी कॅन गाडीवर काम करायचा तर त्याचे वडील हे शेतावर सालगडी म्हणून काम करतात. सूरज हा आईवडीलांना एकटाच मुलगा होता. त्याने आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास आपल्या राहते घरी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.

सूरजने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे. एकुलत्या एक मुलाने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे पण वाचा…

तेलंगणात कत्तलीसाठी जनावर घेऊन जाणाऱ्या तीन बोलेरो जप्त

हे पण वाचा…

शेतक-याने फिरवले उभ्या पिकावर ट्रॅक्टर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.