शनिवारी स्वा. सावरकर न.प. शाळा क्र. 5 मध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

विद्यार्थ्यांसोबत प्रात्यक्षिकांसह संवाद

0 391

वणी: स्वातंत्रवीर सावरकर नगर परिषद शाळा क्रमांक पाच येथे शनिवार दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील ख्यातनाम निवेदक, कवी तथा प्रशिक्षक सुनील इंदुवामन ठाकरे हे सदर विषयार विद्यार्थ्यांसोबत प्रात्यक्षिकांसह संवाद साधतील.

प्रशिक्षक सुनील इंदुवामन ठाकरे हे अनेक वर्षांपासून निवेदन, व्हॉईसओव्हर, व्याख्यान, लेखन अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना विविध विषयांवरती सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात येते. शालाबाह्य उपक्रमाचा भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.