उकणीतील तरुणाची जंगलात आत्महत्या

तालुक्यात आत्महत्येच सत्र सुरू. सोमवारी पुन्हा आत्महत्या

0 12

विवेक तोटेवार, वणी: उकणी येथील आकाश दिवाकर दरवेकर (27) याने सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास मोहुर्ली येथील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश हा उकणी येथील वाल्वो कंपनीत क्लिनर म्हणून काम करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या मागे पत्नी, एक लहान भाऊ, आई वडील असा मोठा आप्तपरिवार आहे.

लॉकडॉऊनच्या काळात त्याचा विवाह झाल्याची माहिती आहे. आकाशाच्या लहान भाऊ शुभम याने घटनेच्या दिवशी 11.30 वाजता फोन करून विचारणा केली होती. तेव्हा आकाशने आपण बोरगावला असून10 मिनिटात घरी येत असल्याची माहिती दिली.

परत अर्ध्या तासाने फोन केला असता फोन बंद होता. त्यानंतर बोर्डा येथील शुभमचा भाचा रोशन याने मोहुर्ली गावाजवळ आकाश याची गाडी असल्याची माहिती दिली. रोशन याने थोडं जंगलात जाऊन बघितले असता आकाशने जंगलात लिंबाच्या झाडाला आपल्या नाईट पॅन्टच्या नाड्याने गळफास लावल्याचे दिसून आले.

आकाशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला. पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. घटनेचा तपास विठ्ठल बुरेवार करीत आहेत.

हा मोहूर्ली येथे का आला व त्या ठिकाणी त्याने का आत्महत्या केली हे अजून कोडेच आहे. याशिवाय मागील एक महिन्यापासून आकाश याची मानसिक स्थिती चांगली नव्हती. त्याचा उपचारदेखील सुरू होता अशी माहिती मिळत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.