रंगनाथ स्वामी पथसंस्थेद्वारे विद्यार्थ्यांचा सत्कार

0 525

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी कल्याणी गाडगे, रोशनी उमरे, कुणाल गोडे, रूपाली पारशिवे, पल्लवी झाडे, संकेत आंबटकर, वैभव राहुलवार, शीतल ठेंगणे, सुस्मिता चव्हाण यांना सन्मानचिन्ह व आर्थिक मदत देऊन सत्कार केला.

यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास काळे, उपाध्यक्ष मांडवकर, सरपंच शंकर लाकडे, ठाणेदार धनंजय जगदाळे, सुधाकर बरडे, पुरुषोत्तम बद्दमवार, प्रेमकुमार खुराणा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह दिले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी व्यवस्थापक श्रीकांत मेंदळकर, कर्मचारी यांनी सहकार्य केले. संचालन वडके यांनी केले. आभार प्रा. गजानन गद्दलवार यांनी मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.