वणीची अनुष्का सिंग विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तिसरी

अनुष्का एनबीएसए महाविद्यालयातील बी,कॉम. ची विद्यार्थीनी

0 15

जब्बार चीनी, वणी: येथील नूरजहाँ बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महाविद्यालयाची बी कॉम तृतीय वर्षाची विद्यार्थिनी अनुष्का सिंह ही संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात वाणिज्य स्नातक परीक्षेत गुणवत्ता यादीत तिसरी आली आहे. तिच्या या यशाबाबत विद्यापीठाद्वारे आयोजित ऑनलाईन दीक्षांत समारंभात तिला  रोख पारितोषिक प्रदान कऱण्यात आले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा 37 वा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. या समारंभात गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कऱण्यात आला. यात वणीची अनुष्का सिंह ही विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत तिसरी आल्याने श्री राधेश्याम मुरलीधरजी गनेडीवाल पुरस्कार देऊन अनुष्काचा सन्मान करण्यात आला.
 
यावेळी दीक्षांत समारंभाकरिता अध्यक्षस्थानी श्री. भगतसिंह कोश्यारी मा. राज्यपाल, तर मुख्य अतिथी नितिन गडकरी केंद्रीय मंत्री, विशेष अतिथी उदय सामंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, डॉ. मुरलीधर चांदेकर कुलगुरू, डॉ. राजेश जयपूरकर प्र.कुलगुरू यांच्या उपस्थितीत समारंभ पार पडला
               
अनुष्का सिंह या विद्यार्थिनीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. रोहित वनकर यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला. ती आपल्या यशाचे श्रेय आई वडील डॉ.गिरीजा सिंह, बिरेंद्रकुमार सिंह, मावशी इंदू सिंह, पूनम सिंह, संस्था अध्यक्ष डॉ. रझ्झाक अहमद, सचिव डॉ. राणानुर सिद्धीकी, प्राचार्य डॉ. रोहित वनकर यांना देते.

हे देखील वाचा:

आज 3 रुग्ण, आता तालुक्यात केवळ 34 ऍक्टिव्ह रुग्ण

मारेगाव तालुक्यात अवघे 19 ऍक्टिव्ह रुग्ण, आज एक पॉझिटिव्ह

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.