शेतक-याला क्षुल्लक कारणावरून लाकडी दांड्याने मारहाण

राजूर येथील घटना, आरोपी विरोधात गुन्हा दाखल

18

विवेक तोटेवार, वणी: राजूर येथे शेतातील धुऱ्यावर झाड तोडण्यावरून झालेल्या शुल्लक वादातून एकाने दुस-याला लाकडी दांड्याने मारहाण केली. ही घटना 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. राजूर येथे अंबादास लक्ष्मण पारोधी यांचे शेत आहे. यांच्या शेतातील धुऱ्यावरील झाड हे आर्यन पिंटू मेश्राम (18) रा. राजूर कॉलरी हा तोडत होता. झाड का तोडत आहे याबाबत विचारणा केली असता आर्यन याने लाकडी दांड्याने अंबादास याच्या हातावर, पायावर व मांडीवर मारहाण करीत जखमी केले. जखमी असल्याने अंबादास यांनी शनिवारी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन गाठत याबाबत दिली. तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 324, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास प्रभाकर कांबळे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.