आज वणी परिसरात 9 रुग्ण

तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढलेत

1 15

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. यातील तब्बल 5 रुग्ण लालगुडा येथील आहेत. जैन ले आऊट वणी 1, रंगनाथ नगर वणी 1, गणेशपूर 1, उकणी 1 कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

रविवारी यवतमाळ येथून 65 रिपोर्ट आलेत. यात 9 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज 07 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली तर 2 पॉजिटिव्ह रॅपीड टेस्ट झाल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 07 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 26 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 26 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 986 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 937 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. रविवारी 09 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली. सध्या तालुक्यात 26 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 09 जण होम आयसोलेट आहेत. 11 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये तर 06 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंतची तालुक्यातली मृत्यूसंख्या 23 आहे.

सावधगिरी बाळगणे तेवढेच महत्त्वाचे
गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. याशिवाय शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्यादेखील कमी-जास्त होत आहे. रविवारी हा आकडा अचानक वाढला. सध्या कोरोनाची भीती गेल्याने अनेकांनी सावधगिरी बाळगणे कमी केले आहे. त्यामुळेही रुग्ण वाढण्यास मदत होत आहे.

हे पण वाचा…

जेव्हा नगराध्यक्षावरच उपोषणाला बसण्याची पाळी येते….

हे पण वाचा…

मंगळवारी 8 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वणी बंद

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.