विराणी टॉकीज जवळ सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर धाड

यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तिघांना अटक तर एक अल्पवयीन ताब्यात

16

विवेक तोटेवार, वणी: शनिवार दुपारी 4 वाजताच्या सुमारास स्थानीय गुन्हे शाखा यवतमाळ यांनी विराणी टॉकीज जवळ सुरू असलेल्या एका मटका अड्यावर धाड टाकली. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली तर एका विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर शनिवारी 5 नोव्हेंबर रोजी स्थानीय गुन्हा शाखा यवतमाळ यांनी विराणी हॉल जवळ सुराणा हॉस्पिटलाच्या बाजूला असलेल्या एका घराच्या वरच्या मजल्यावर धाड टाकली. या धाडीत काही इसम हे फोनवर वरली मटका हा जुगार खेळत होते.

या धाडीत शेख अल्ताफ हुसेन मन्सूर हुसेन (35) रा. शांतीनगर अदिलाबाद हल्ली मुक्काम घटनास्थळ, दिनेश प्रशांत जसवंत (46) रा. तैली फैल वणी, अक्रम शेख याकूब शेख (27) पंचशील नगर वणी या तिघांना अटक करत एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले. यांच्याकडून 12 मोबाईल, नगदी व वरली मटक्याचे साहित्य असा एकूण 1 लाख 32 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात प्रदीप परदेशी पोलीस निरीक्षक स्थानीय गुन्हे शाखा यवतमाळ, सपोनि अमोल मुडे, सपोनि विवेक देशमुख, किशोर झेडेकर, निलेश राठोड, महेश नाईक, मीनाक्षी फुसे, रजनीकांत मडावी, वाहन चालक नरेश राऊत यांनी केली.

हे देखील वाचा: 

वसंत जिनिंगसाठी आज मतदान… कोण मारणार बाजी?

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.