रवीनगरमध्ये मंगळवारी रात्री चोरट्यांचा धुमाकुळ

एकाच रात्री फोडले 4 घरे

13

विवेक तोटेवार, वणी: शहरातील रविनगर येथे 5 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास चार ठिकाणी घरफोडी झाली. यातील एका व्यक्तीच्या घरातून 2200 रुपये नगदी चोरी झाले. मात्र इतरांच्या घरातून मात्र चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. घरमालकांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी तुलसीदास विठ्ठलराव वटे (53) रा. रविनगर यांची मांगरूळ येथे शेती आहे. त्याच ठिकाणी त्यांचे कुटुंब राहते. सोबतच वणीतील रविनगर येथे त्यांच्या मालकीचे घर आहे. 5 ऑक्टोबर रोजी तुलसीदास हे त्यांच्या वणीच्या घरी आले. दिवसभर आपले कामे करून गावी निघून गेले.

6 ऑक्टोबर रोजी सकाळी 5.45 रोजी सकाळी त्यांच्या शेजारी राहणारा भाऊ अरविंद वटे यांनी फोनवरून माहिती दिली की, त्यांच्या घराचे कुलूप तुटले आहे. घरातील सामान अस्ताव्यस्त पडून आहे. तुलसीदास यांना चोरी झाल्याची कल्पना आली त्यांनी त्वरित वणीला आले व पाहणी केली.

त्यांनी कपाटाची तपासणी केली असता त्यातून 2200 रुपये चोरी गेल्याचे समजले. सोबतच त्याच परिसरातील तीन घराचे कुलूप तोडले होते. त्यांच्या घरातून काहीच चोरी गेले नव्हते. त्याच परिसरात राहणाऱ्या अरविंद वटे यांच्या घराचे दार बाहेरून लावले असल्याची माहिती आहे.

तुलसीदास यांच्या तक्रारी वरून वणी पोलिसात कलम 457, 380 नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास विठ्ठल बुरेवार करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.