शिक्षक विजय ढवळे यांचा माजी विद्यार्थ्यांनी केला सत्कार

शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता

9

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगर पालिका शाळा क्रमांक 2 च्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक विजय ढवळे यांचा शिक्षक दिनी सत्कार केला. मुळचे उकणी या गावातून आलेले शिक्षक विजय ढवळे हे नगर परिषद शाळा क्र 2 मध्ये 1980 ला रुजू झाले. दरम्यान त्यांनी नगर पालिकेच्या विविध शाळेत आपली सेवा दिली. 2012 या वर्षी नोव्हेंबर ते सेवानिवृत्त झाले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नगर परिषद शाळा क्र 2 च्या माजी विद्यार्थ्यांनी (1988 ची बॅच) त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

काही दिवसांआधी नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 2 चे विद्यार्थी व्हॉट्स ऍप गृपच्या माध्यमातून एकत्र आले. दरम्यान त्यांना त्यांचे 1 ते 4 वर्गा पर्यंत शिकवणारे विजय ढवळे हे सेवानिवृत्त झाल्याचे कळले. शिक्षक दिनाचे औचित्स साधून विद्यार्थ्यांनी भेटण्याचा निश्चय केला. विविध ठिकाणाहून त्यांचे विद्यार्थी एकत्र आले व त्यांनी जिल्हा परिषद कॉलनी येथील त्यांच्या घरी अचानक भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार करून माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अचानक दिलेल्या भेटीमुळे शिक्षक विजय ढवळे गहिवरले होते.

शिक्षक विजय ढवळे यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सागर मुने, विनोद बुच्चे, योगेश कोणप्रतिवार, गणेश रायपुरे, गोकुळ पवार, गणेश लोणारे, श्रीकृष्ण वाघमारे, गणेश महाजनवार, जितेश पानघाटे इत्यादी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.