प्रेमविवाह केलेल्या जावयाची सासूला मारहाण

41

जितेंद्र कोठारी, वणी: मुलीसोबत प्रेमविवाह करणाऱ्या जावयाने सासूला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील घोन्सा येथे घडली. सासूने केलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी आरोपी जावई मयूर अनंता सोयाम (23) रा. दहेगाव (कुंभा) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पिडीत महिलेनी दिलेल्या तक्रारीनुसार तिला दोन मुली असून मोठ्या मुलीचा लग्न झाले आहे. लहान मुलीने फेब्रुवारी 2023 मध्ये कुटुंबियांच्या मर्जीविरुद्ध दहेगाव (कुंभा) येथील मयूर अनंता सोयाम सोबत घोन्सा येथील गजानन महाराज मंदिरात प्रेम विवाह केला. लग्नाच्या काही दिवसानंतरच मयूर हा पत्नीला मारहाण करून त्रास द्यायचा.त्यामुळे ती 1 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या आईवडिलांकडे घोंसा येथे आली.

दिनांक 2 सप्टेंबर रोजी मयूर सोयाम हा घोंसा येथे सासुरवाडीला आला. तिथे त्याने मद्यधुंद अवस्थेत पत्नी सोबत वाद घातला. त्यावर त्याची सासू हिने जावई मयूर याला तुम्ही तुमच्या मर्जीने मुलीसोबत लग्न केला आणि आता मारझोड करून माहेरी पाठविले. असे म्हटले असता दारूच्या नशेत असलेल्या जावई मयूर सोयाम यांनी सासूला शिवीगाळ करीत सासुला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत सासूच्या डाव्या हात फ्रॅक्चर झाला. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी आरोपी जावई मयूर अनंता सोयाम (23) रा. दहेगाव (कुंभा) ता. मारेगाव विरुद्ध कलम 323, 325, 504, 506 भादवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.