मेंढोली येथील युवकाला सर्पदंश

प्रकृती धोक्याबाहेर, उपचार सुरू

0 18
विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील मेंढोली येथील एका युवकाला सर्पदंश झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास  घडली. मयूर पुरुषोत्तम कावडे (२०) असे सर्पदंश झालेल्या युवकाचे नाव आहे.\
 
मयूर आणि त्याचा मित्र राजू जंगराव चिकराम हे दोघेही दुचाकी गावाकडे जात होते. दरम्यान वरझडी रस्त्यावरील नाल्यावर दुचाकी थांबवून मयूर शौचास जात असताना त्यांच्या पायाला सर्पदंश झाला. राजूने मयुरला त्वरीत वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मयुरची प्रकृती धोक्याबाहेर असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

 

पावसाळी वातावरणात साप आणि नाग मोठ्या प्रमाणात बाहेर निघतात. सर्वच साप हे विषारी नसतात. तरीदेखील ओल असलेल्या भागांत काळजी घेणे आवश्यक असते. योग्य प्रथमोपचारांसह लगेच डॉक्टरकडे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला नेणे अपेक्षित असते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.