सुयश: अडेगाव येथील दोन विद्यार्थी नवोदयसाठी पात्र

पात्र विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव

0 1,061

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पटसंख्येच्या दृष्टीने तालुक्यात सर्वात मोठी असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अडेगाव येथील दोन विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरले आहेत. त्यांना आता बेलोरा (घाटंजी) इेथील इयत्ता 6 वी साठी प्रवेश घेता येणार आहे.

संघर्ष उमाकांत पायताडे व अश्विनी मोहन कोटनाके असे या पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. अभ्यासात हुशार असलेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आईवडील, वर्गशिक्षक, मुख्याध्यापक व शाळेतील इतर शिक्षकांना दिलेले आहे.

संघर्ष उमाकांत पायताडे व अश्विनी मोहन कोटनाके

त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि अडेगाव ग्रामवासीयांनी अभिनंदन केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.