अवघ्या काही तासातच मोबाईल चोरटा गजाआड

लालगुड्याहून एकाला अटक, डीबी पथकाची कारवाई

0 1,557

विवेक तोटेवार, वणी: शहरातील शास्त्रीनगर भागातून 1 जुलै रोजी एका इसमाचा खिडकीतून मोबाईल व नगदी चोरी गेले होते. याबाबतची तक्रार वणी पोलिसात 5 जुलै रोजी देण्यात आली. पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीचा छडा लावला व त्याला अटक करून मोबाईल व नगदी जप्त केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, 1 जुलै रोजी शहरातील शास्त्रीनगर भागात राहणार नवाब खान नासीबदार यांचा खिडकीत ठेऊन असलेला मोबाईल व 1500 नगदी चोरीला गेले. याबाबत वणी पोलिसात 5 जुलै रोजी नवाब यांनी तक्रार दिली. तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

खबरीकडून याबाबत माहिती मिळताच डीबी पथकाने आरोपी राजू पुरुषोत्तम पोटे (35) रा. नवीन लालगुडा याला अटक करून त्याच्याकडून चोरी गेलेला मोबाईल जप्त केला. त्याची किंमत 12 हजार रुपये यासह आणखी एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत 10 हजार रुपये व 800 रुपये नगदी जप्त केले. त्याच्याकडून एकूण 22 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, अमित पोयाम, दीपक वाड्रसवार, सुदर्शन वनोळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.