मारेगाव अपघात: दुस-या विद्यार्थ्यानेही गमावला जीव

0 1,003

मारेगावः गुरूवारी मारेगाव येथे दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात एक जण ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. यात गंभीर असलेल्या दुस-या विद्यार्थ्याचाही मृत्यू झाला आहे. उपचारासाठी चंद्रपूरला हलविताना त्याचा वाटेत मृत्यू झाला.

कसा झाला अपघात ?
केळापूर तालुक्यातील मुंजाळा या गावातील इयत्ता बारावीचा विद्यार्थी रविसागर राजेंद्र मेश्राम (18) हा गुरुवारी सकाळी मारेगाव येथे कॉलेजच्या अॅडमिशनसाठी सकाळीच घरून निघाला. त्याने एम. एच. 29, 3234 क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर गाडी घेतली. रविसागरसोबत त्याचा मित्र अक्षय नांदूरकर गाडीवर सोबत होता. बोटोणी येथील सुरेश त्र्यंबक आत्राम (20) व प्रकाश राजू घाटे (26) हे त्यांच्या गाडीने बोटोणीहून येत होते. दोन्ही दुचाकीची मारेगाव जवळील विनायक कोटेक्स जिनिंग जवळ धडक बसली.

या अपघातात रविसागर हा जागीच ठार झाला. तर अक्षय, सुरेश व प्रकाश जखमी झाले होते. गंभीर अक्षयला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची परिस्थिती नाजूक असल्याने त्याला उपचाराकरिता चंद्रपूरला रेफर करण्यात आले. मात्र वाटेतच अक्षयचा मृत्यू झाला. दोन विद्यार्थ्यांना मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.