घोन्सा येथे शाळेच्या मैदानात शेतक-याची विष पिऊन आत्महत्या

मृत व्यक्ती सोनेगाव येथील रहिवाशी

8

दिलीप काकडे, घोन्सा: घोन्सा येथील एका शाळेच्या मैदानात एका 50 वर्षीय इसमाने मोनोसिल हे विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. बंडू रामचंद्र बद्रे असे या इसमाचे नाव असून ते सोनेगाव येथील रहिवाशी होता. बुधवारी दिनांक 5 जानेवारी ला दुपारी 4 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान घोंसा येथील काही व्यक्तीला बंडू मैदानातील चिंचेच्या झाडाच्या आडोश्याला दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता बंडू यांच्या तोंडातून फेस निघत असल्याने आढळून आले. त्यांनी तात्काळ घोंसाचे पो पाटील सचिन उपरे यांना कळविले असता त्यांनी ही बाब सामाजिक कार्यकर्ते दिलीप काकडे यांना कळविली. दिलीप काकडे यांनी कोणतीही वेळ न गमविता बंडू यास स्वतःच्या गाडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्या केल्याचे कारण अद्याप कळले नसले तरी शेतात पिक न झाल्याने नैराश्यापोटी त्यांनी आत्महत्या केल्याचे गावात बोलले जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.