महापरिनिर्वाण दिनानिमित्त डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी या मोफत वर्कशॉपचे आयोजन

6 डिसेंबरला केला जाणार विश्वविक्रम, रजिस्ट्रेशन करण्याची आजची शेवटची तारीख

8

पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुधवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी हा ऑनलाईन कोर्स विद्यार्थ्यांना मोफत करता येणार आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा कोर्स चालणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत हा कोर्स असून याला यूनिसेफ या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी राज्यातील 1 लाख 11 हजार 111 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा एक विश्वविक्रम राहणार असून याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्याकरिता विद्यार्थ्यांना https://skills.myp2e.org या लिंक वर दिनांक 5 डिसेंबर पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. या अभ्यासक्रमात दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे विविध डिजिटल टूल, वर्ड, एक्सेल, इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. शहजाद, डॉ. रंजना जिवने व डॉ. रोहित वनकर यांनी केले आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.