उधारीवरून मामाचा भाच्यावर हल्ला, सब्बल व काठीने मारहाण

पैसे उसने देणेही पडत आहे महागात

10

भास्कर राऊत, मारेगाव: आपल्या वडिलांनी हात उसने दिलेले पैसे मागायला गेलेल्या भाच्याला त्याच्या सख्या मामाने आणि दोन मेहुण्यांनी जबर मारहाण केली. या घटनेत भाचा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना तालुक्यातील हिवरी येथे घडली असून मारहाण करणाऱ्या आरोपी विरोधात मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान जखमी भाच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

सविस्तर वृत्त असे की, हिवरी येथील शायनिक बळी काळे याने त्याच गावात राहणारा त्याचा साळा वसंता अडतिस घोसले वय 52 वर्षे याला थोडे थोडे करीत मागील 4-5 वर्षामध्ये जवळपास दीड लाख रुपये उसने दिले होते. आता गरज पडल्याने शायनिक काळे यांनी वसंता याला पैशाची मागणी केली. त्यावर वसंता याने पैसे देत नाही काय करायचे ते कर असे म्हटले.

ही गोष्ट शायनिक यांनी आपल्या मोठ्या मुलाला प्रवीण शायनिक काळे वय 32 याला सांगितली. प्रवीण याने आता तुम्ही पैसे मागायला जाऊ नका मीच मामाला पैसे मागून आणतो असे म्हटले. गेल्या एका महिन्यांपूर्वी प्रवीण हा त्याचा मामा वसंता घोसले याला पैसे मागायला गेला, तेव्हा तुला पैसे कधीच देत नाही. तू पुन्हा पैसे मागायला यायचे नाही. नाहीतर तुला जीवानिशी मारून टाकील अशी धमकी दिली होती.

पण मामा आहे तो असे करणार नाही असे समजून त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. शुक्रवारी दि. 4 नोव्हेंबरला सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान मुलगा प्रवीण हा मामाला पैसे मागायला गेला असता मामा वसंता अडतीस घोसले, मामाचा मुलगा (मेहुणा) तिरत वसंता घोसले 29 व दिलीप वसंता घोसले 26 या तिघांनी मिळून प्रवीण याला लोखंडी सब्बल आणि लाकडी दांड्याने डोक्यावर, हातावर, पायावर आणि चेहऱ्यावर मारून जखमी केले. असे तक्रारीत म्हटले आहे

या प्रकऱणी वडील शायनिक यांच्याकडून दाखल करण्यात आली आहे. प्रवीण याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम 307, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

मारधाड, ऍक्शनसाठी वणीकरांनो राहा सज्ज… वणीत सूर्यवंशी रिलीज

ऑनलाईनपेक्षाही कमी दरात मोबाईल उपलब्ध

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.