आज शहरात कोरोनाचे 6 रुग्ण

शहरात वाढतोय कोरोनाचा प्रकोप?

0 11

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळलेत. हे सर्व रुग्ण आरटीपीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आला आहे. आज आलेल्या रुग्णांतील सर्व रुग्ण हे वणी शहरातील आहेत. आजच्या रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या तर वाढली आहे शिवाय वणी शहरात देखील कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसत आहे.

आज यवतमाळ हून 26 अहवाल प्राप्त झाले यातील 6 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 20 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. तर आज 26 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात सर्व संशयीत निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 17 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 32 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 40 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 798 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 755 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज 3 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. सध्या तालुक्यात 40 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 24 जण होम आयसोलेट आहेत. 16 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 9 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालुक्यात मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.