शेतात काम करणा-या महिलांवर रानडुकराचा हल्ला

तीन महिला गंभीर तर दोन किरकोळ जखमी

0 980

विवेक तोटेवार, वणी: रानडुकराच्या हल्ल्यात पाच महिला जखमी झाल्याची घटना गणेशपूर येथे घडली. यातील तीन महिला गंभीर जखमी असून दोन महिलांना किरकोर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वणीजवळ असलेल्या गणेशपूर येथे शामराव मोहितकर यांचे शेत आहे. गुरुवारी त्यांच्या शेतात काही महिला काम करत होत्या. तेव्हा अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. यात लता आत्राम (30) तुळसाबाई आसूटकर (35) सुमित्रा टेकाम (50) या गंभीर जखमी झाल्या तर इतर दोन महिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या तिन्ही जखमी महिलांवर वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

रानडुकराच्या हल्ल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. शेतात महिला, वृद्ध कामाला जातात. वन्यप्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने या हिंस्र पाण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी आणि शेतमजूर करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.